रत्नागिरी दि.१ (संतोष नलावडे) : कोकणातील प्रसिद्ध होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता आई तळेकरीण मातेचा शिमगोत्सव रविवार ५ मार्च रोजी होणार आहे. शुक्रवार २४ फेब्रुवारी पासून फाक पंचमीने शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. गावातील प्रत्येक वाडीमध्ये होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत.
शनिवार २५ पासून फिरते खेळे करजुवे तिसंगवाडी येथून सुरू होऊन कावडी, वाकसालवाडी, ब्राह्मणवाडी ते चाफे, मोरे वाडीपर्यंत गेले. २६रोजी निवईवाडी, सुर्वेकोंड सुतारवाडी, विचारे कोंड, दुर्गवलेवाडी, २७रोजी लोहारवाडी, गवतडेवाडी, २८ रोजी डावलवाडी, गुरव वाडी करून संपूर्ण गावचा फेरा पूर्ण होणार आहे. शनिवार ४ मार्च रोजी देवीची रूपे लावण्याचा कार्यक्रम होईल याच दिवशी संध्याकाळी सूरमाड तोडून सर्व मानकरी,खूमदार व सर्व गावकरी मंडळींच्या उपस्थितीत देवळात सहाणेजवळ आणून उभा केला जाणार आहे. बुधवार ५ मार्च रोजी होम लागणार असून शिमगा होणार आहे. याच दिवशी रात्री पहिल्या मानाला पालखी येईल. यानंतर ६ व ७ रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा मान तिसंगवाडीमध्ये होईल. ८ रोजी चौथा मान गुरववाडी, ९ रोजी पाचवा मान निवईवाडी, १० रोजी सहावा मान डावलवाडी, ११ रोजी निवईवाडीमध्ये बंड्या खोत यांचेकडे मान होऊन संध्याकाळी पालखी तिसंगवाडीमध्ये वस्तीला येईल.यानंतर भोवनी सुरू होईल. १२ रोजी तिसंगवाडी समीर नलावडे यांच्या घरापर्यंत, १३ रोजी सुभाष नलावडे यांचे घरापासून ते तिसंगवाडी पूर्ण होईल. १४ रोजी चोळीपातळ (विचारेकोंड)व सुतार वाडी, १५ रोजी दुर्गवलेवाडी, १६ रोजी निवईवाडी, गोवळकर ते भूषण कांगणे यांचे घरापर्यंत. १७ रोजी कावडी ते वाकसालवाड, १८ रोजी आडावरची डावलवाडी,वाकसालवाडी ते मोरेवाडी, १९ रोजी लोहारवाडी ते गवतडेवाडी, २० रोजी डावलवाडी, २१ रोजी भाटलेवाडी(डावलवाडी)ते गुरव वाडी भोवनी पूर्ण होईल व याच दिवशी देवीचा शिंपणेउत्सव संपन्न होईल. २२ रोजी गूढी पाडव्याला शिमगोत्सवाची सांगता होईल.
तरी शिमगोत्सवासह सर्व कार्यक्रमांना देवीच्या सर्व भाविकांनी उपस्थित राहून शिमगोत्सवाच्या आनंदात सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन सर्व मानकरी, खूमदार व गावकरी मंडळींनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!