मुबई दि.५: मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पवेलियन, मरीन लाइन्स, मुंबई येथे 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या मुंबई सिटी झोन, मुंबई सबअर्बन झोन आणि ठाणे झोन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026-27 या स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 7 पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाने झोनल पातळीवर आपली भक्कम छाप उमटवली आहे. स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील असंख्य खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दाखविलेली जिद्द आणि चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली. सदर
स्पर्धेत साहिल साळुंखे -5000 मी. धावणे (सुवर्ण पदक) व 10000 मी. धावणे (कांस्य पदक), प्रणव कटेकर – तिहेरी उडी(सुवर्ण पदक), कु. शिवकन्या ताटे 10000 मी. धावणे (रौप्य पदक) , कु. आचल शेळके – 5000 मी. धावणे (कांस्य पदक), ओम वरुटे – गोळफेक (कांस्य पदक) तसेच आंचल शेळके, भूमिका पाटील, गौरी गावडे, करीना पवार, शिवकन्या ताटे यांनी 4×400 मी. रिले (कांस्य पदक) पटकाविले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर म्हणाले की, मागील काही वर्षापासून महाविद्यालयातील खेळाडूंनी मुंबई विद्यापीठात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपला दबदबा निर्माण केला आहे. या सर्वांनी आपल्या यशात सातत्य राखत या वर्षी देखील तब्बल 7 पदक जिंकले, या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो. या आनंदाच्या प्रसंगी त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी खेळाडूंचे या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव किशोर राजेनिंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, महेंद्रशेठ घरत, अरुणशेठ भगत, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष परेशशेठ ठाकूर तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर व संजय कडू आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यास्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, उपप्राचार्य डॉ. सोनू लांडे, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण गवळी, उपप्राचार्य व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. सोपान गोवे, ग्रंथपाल सुनील अवचिते, प्रा. प्रवीण गायकर, एन.सी.सी. प्रमुख प्रा. रामदास जमनुके व डॉ. यशवंत उलवेकर व जिमखाना कमिटीतील डॉ.लीना मेश्राम, डॉ.रूपश्री ठाकूर, प्रा. अतुल पोखरकर, प्रा.मयूर पाटील, प्रा.नयन कोळी या सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


