पनवेल दि.२१: ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी तसेच मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणारा कर्णकर्कश आवाज रोखून नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष जनजागृती व कारवाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ध्वनी प्रदूषणाचे प्रतीक असलेल्या रावणाची प्रतिकृती तयार करून त्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी एकूण १११ मॉडिफाइड सायलेन्सर तोडून नष्ट करण्यात आले.
मॉडिफाइड सायलेन्सरमुळे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाज निर्माण होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ध्वनी प्रदूषण रोखणे, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्यांना प्रतिबंध घालणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
हा कार्यक्रम पोलीस उपायुक्त, वाहतूक, डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा यांच्या पुढाकाराने पार पडला.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक योगेश गावडे, पोलीस निरीक्षक महेश सरतापे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कदम, पनवेल शहर वाहतूक शाखेतील सर्व अंमलदार नगरसेवक राजू सोनी तसेच पनवेल विभागातील पत्रकार उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषणाविरोधात ठोस संदेश देण्यात आला. वाहनांमध्ये अनधिकृत मॉडिफाइड सायलेन्सर बसवू नयेत, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या उपकरणांचा वापर टाळावा आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

“ध्वनी प्रदूषणाला आळा घाला, शांत आणि सुरक्षित पनवेल घडवा!”
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या उपक्रमामुळे ध्वनी प्रदूषणाविरोधातील जनजागृतीला चालना मिळाली असून, नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषणमुक्त शहर घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133