पनवेल दि१३: ओटिकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत तसेच स्फेरुल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत गुळसुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गुळसुंदे, लाडीवली, आकुळवाडी, आदिवासी वाड्या तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर बुधवार, दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गुळसुंदे समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये रक्त तपासणी, ईसीजी, रक्तदाब तपासणी, सर्व साधारण आरोग्य तपासणी, तसेच पोषण विषयक समुपदेशन या सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि पोषणविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे. गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
