आमदार प्रशांत ठाकूर सह चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदान
पनवेल दि.२२: दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. यावर्षी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार रक्तदान करून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदार संघातील पनवेल, कामोठे, कळंबोली, आकुर्ली, खांदा कॉलनी, खारघर, ओवेपेठ, आदी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्वतः आमदार प्रशांत ठाकूर व त्यांचे चिरंजीव अमोघ ठाकूर यांनी पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात रक्तदान करून समाजाप्रती आदर्श उदाहरण ठेवले. या उपक्रमात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. सर्व रक्तदात्यांना ब्लड डोनेट कार्ड आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

🛑गजबजला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग🔹तब्बल १५ वर्षांनी एकत्र…

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!