कळंबोली दि.२६ : कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलातील ज्युनियर कॉलेज कळंबोली या विद्यालयातील सभागृहात आज सकाळी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई युनिट चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुकाराम नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश पाटील, पोलिस हवालदार प्रदीप खाडे, ज्युनियर कॉलेजचे उप प्राचार्य संजय पाटील, सायन्स विभाग प्रमुख किशोर पाटील, कॉमर्स विभाग प्रमुख नजीर शेख, आर्ट्स विभाग प्रमुख आण्णासाहेब झिटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख शीतल शिंदे असे मान्यवर सह ज्युनियर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागातील व तिन्ही शाखेतील प्राध्यापकांसह १२ वी तील चार वर्गांचे ३०० विद्यार्थी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन, दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई युनिटचे मान्यवर अधिकारी व ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख व्यासपीठावर होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा परिचय चारू तबकडे यांनी करून दिला. नलावडे यांचे स्वागत संजय पाटील यांनी केले, राजेश पाटील यांचे स्वागत किशोर पाटील यांनी केले तर प्रदीप खाडे साहेबांचे स्वागत नजीर शेख यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना संजय पाटील यांनी अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला व्यसनांचे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन केले तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नलावडे यांनी अंमली पदार्थांची तस्करी, व्यसनाचे आधीन झालेल्यांचे स्वतःसह कुटुंबाची झालेली वाताहात, शत्रू राष्ट्रांकडून आपल्या देशातील तरुणांची क्रियाशक्ती खच्चीकरणाचे प्रयत्न इत्यादी विषयावर सखोल उद्बोधन केले. उपस्थित सर्व ३०० विद्यार्थी आणि २२ शिक्षकांना यावेळी अंमली पदार्थ विरोध करणारी शपथ घेतली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख शीतल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन व आभार प्रकट केले.

🛑’जीटीआय लेबर बोर्ड’साठी कामगारांचे ठिय्या आंदोलन🔸कामगार नेते महेंद्र घरत कामगारांसाठी उतरले रस्त्यावर
🛑लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता मार्च !
🛑Electricity Bill News: विजेचं बिल कमी होणार !🔸वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार- अविनाश कोळी

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!