अलिबाग दि.23: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णांना कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडस् ची,तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती होण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची ही गरज तातडीने लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in या वेबसाईटवर www.covid19raigad.in ही url लिंक संलग्न केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस् ची संख्या व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या शासकीय वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची, शासन निर्णयाची, विविध शासकीय आदेशांची इत्यंभूत माहितीही उपलब्ध आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, वरिष्ठ तांत्रिक संचालक व जिल्हा सूचना- विज्ञान अधिकारी चिन्ता मणि मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी केले आहे.