पनवेल दि.१४: श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट ,विद्यार्थी वाहक संस्था पनवेल ,रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ,पनवेल नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघटना व पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या वतीने झुलेलाल मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 105 रक्तदात्यांनी सहभाग घेतला
यावेळी आरोग्य तपासणी शिबिर व अवयव दान विषयीच्या मार्गदर्शन शिबिरास पनवेलकरांनी भरघोस पाठिंबा दिला. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता ऍडव्होकेट मनोहर सचदेव, अमोल साखरे, मुरलीधर ढाके, भूषण चोणकर, किसन रौंदळ, पांडुरंग हुंमणे, निलेश पोटे, इंदुमती ठक्कर, सचिन भिसे, संगीता साखरे यांनी विशेष मेहनत घेतली. या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य हे की 58 वर्षाच्या मालोतकर यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर आयोजनामध्ये मोलाचा सहभाग असणारे ऍडव्होकेट मनोहर सचदेव यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी सर्व संस्थांचे व टाटा मेमोरियल सेंटर खारघर या रक्तपेढीचे आभार मानले व पुढील रक्तदान शिबिर 12 ऑक्टोबर रोजी असल्याचे जाहीर केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!