पनवेल दि.१३: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी, पदव्युत्तर वर्गातील व विद्यावाचस्पती (पी.एच. डी.) पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व.चांगु काना ठाकूर साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ. प्रसाद महादेव कारंडे व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सिताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, स्वप्नील ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तसेच महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पनवेल चे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अॅड. राहुल घरत, अतुल भगत व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविले. यानंतर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भविष्यातील संधींचे सोने करण्यासाठी येणार्या आव्हानांवर स्वार होऊन पुढे जाण्याचा संदेश देत, जागतिक पातळीवरच्या आव्हानांसाठी सज्ज राहण्यास सांगितले.
प्रस्तुत सोहळ्याचे मुख्य अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद महादेव कारंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, भारतीय संस्कृतीने शिकवलेल्या उदात्त विचारसरणीचा आपल्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून समावेश झाला ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरची दारे खुली झाली आहेत व त्याचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.
रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे . त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थांना सांगितले की हि पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा तसेच विद्यार्थांच्या पुढच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले .
या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील यांनी कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे प्रभारी डॉ. एस. एन. परकाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. ए. व्ही. पाटील, प्रा. एन. एच. कडु तर आभारप्रदर्शन डॉ. एस. एन. परकाळे यांनी केले, तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
![]()
