नवी मुंबई दि.१५: सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवत वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये आपले नाव नोंदवले आहे. नुकतेच लोणावळास्थित कॅनरी आयलंड मध्ये त्यांनी शिवभक्तीच्या शिखर स्तोत्र ‘शिवतांडव स्तोत्रम्’ चे संपूर्ण गायन केवळ 1 मिनिट 33 सेकंदात पूर्ण करून हा अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, इतक्या जलद गतीतही त्यांनी मंत्रांचे अत्यंत स्पष्ट उच्चार, सुर, ताल व लय यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले जे त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कठोर साधनेचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे.
या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत विराग मधुमालती यांच्यासोबत वंदना वानखडे, तसेच कॅनरी आयलंडचे संस्थापक नंदकुमार वाळंज व संचालक सागर वाळंज उपस्थित होते.
वर्षानुवर्षांची शिवसाधना व सामाजिक कार्यः विराग मधुमालती अनेक वर्षांपासून शिवसाधनेत लीन असून मागील चार वर्षांपासून त्यांनी शिवतांडव स्तोत्रम् वर विशेष संशोधन व अभ्यास केला.
याआधीही त्यांनी ७ वेळा जागतिक विक्रम प्रस्थापित करून भारताचा गौरव वाढवला आहे आणि अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती केली आहे.
त्यांच्या काही केलेल्या उल्लेखनीय कार्यात नेत्रदान जनजागृतीसाठी सलग 100 दिवस डोळ्यांवर काळी पट्टी बांधून दिव्यांग व्यक्तीप्रमाणे जीवन जगले व जागोजागी कार्यक्रम घेऊन नेत्रदायचे महत्व लोकांना पटवून दिले तसेच सप्टेंबर 2024 मध्ये नवी मुंबई ते राजस्थानातील नाकोडाजी या 1305 किमी अंतराची पदयात्रा साधारण १०० दिवसांत पूर्ण केली, यावेळी 54,000 वृक्षारोपण केले व गावोगावी ठिकठिकाणी पर्यावरण जनजागृतीचे कार्य केले. ह्याच यात्रेत सलग 24 तासांत 111 किमी चालत आणखी एक जागतिक विक्रम नोंदवला.
विराग मधुमालती यांची ही अभूतपूर्व कामगिरी केवळ भारतीय संस्कृती आणि भक्तीपरंपरेला जागतिक स्तरावर गौरव मिळवून देणारी नसून समर्पण, अनुशासन व सकारात्मकतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

विराग यांनी या सादरीकरणाचे चित्रीकरण भारतातील विविध ठिकाणी करून ते त्यांच्या यूट्यूब चॅनल ‘Virag Madhumalati Music’ वर प्रकाशित केले आहे.
🛑माझी कैलास मानसरोवर यात्रा ०.२ – महेंद्र घरत🔹’कैलास मानसरोवर यात्रा’ प्रवासातील स्मरणीय अनुभव कथन

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!