कर्जत दि.५: ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) रायगड क्षेत्रीय कार्यालय आणि प्रशासनाच्या संयुक्त सहभागातून साईडोंगर-१ जलविद्युत प्रकल्पासाठी गौरकामत येथे झालेली जनसुनावणी लोकांच्या सहभागातून यशस्वी ठरली. शेकडो लोकांनी सहभागी होत, प्रकल्पाविषयी सकारात्मकता दर्शवली.
टोरेंट कंपनीच्या सादरीकरणात पर्यावरणीय प्रभावांचे मूल्यमापन, जैवविविधतेचे संरक्षण, आणि स्थानिक जनतेसाठी विकासाच्या संधी यावर भर देण्यात आला. अनेकांनी प्रकल्पाबद्दल सकारात्मक मत नोंदवत, “हा प्रकल्प आमच्या गावाच्या विकासाला गती देईल,” अशा भावना व्यक्त केल्या. खास करून महिलांनी प्रकल्पास पाठिंबा देताना “विरोधक हा गावाबाहेरील अजेंडा” असल्याचे सांगितले.
या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरण व्यवस्थापन आराखड्यांतर्गत (EMP) एकूण १०५ कोटी रुपयांची तरतूद असून १०५ कोटींच्या निधीतून आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, आणि आपत्ती प्रतिबंध यांसारख्या योजना राबवण्यात येणार आहेत असे रझू करण्यात आले. स्थानिक लोकांनी प्रकल्पाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची आशा व्यक्त केली.
सुनावणी शांततेत पार पडली आणि पर्यावरण विभागाच्या उपस्थितीत योग्य प्रतिसाद मिळाल्यामुळे बहुतांश ग्रामस्थांत समाधान दिसून आले.

🛑Thakur Infraprojects Pvt Ltd:🔸कर्मचाऱ्यांच्या दहावी, बारावी परीक्षेत यश संपादीत केलेल्या पाल्यांचा सत्कार

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!