पनवेल, दि.११: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. लसींचा  तुटवडा असल्याकारणाने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला होता. मात्र ५००० कोविशिल्ड लसींची उपलब्धता झाली असल्याने उद्या (दि.१२) पासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये नऊ शासकीय आणि बारा खाजगी लसीकरण केंद्रे चालू आहेत. यामधील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता २० लसीकरण  केंद्रावर पुर्वीप्रमाणे लसीकरण कार्यक्रम सुरू असणार आहे.
पालिका क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत एकुण 632 लसीकरण  सत्रे झाली आहेत. यामध्ये एकुण  63 हजार 879 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!