पनवेल दि.१२: महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबईच्या अध्यक्षपदी संतोष आंबवणे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन गेली कित्येक वर्षे कार्यान्वित आहे. येत्या काळात सिडको, महानगरपालिका, नयना व इतर क्षेत्रातील विकास कामांचे प्रश्न व शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत तीव्र पणे मांडून सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा संतोष आंबवणे यांचा मानस आहे. तसेच विकासकांच्या अडचणी सोडवणेसाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येतील, त्याचप्रमाणे साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के प्लॉट वाटपासंबंधीचे प्रश्न, नैना क्षेत्रातील टीपी स्किमचे भूखंड वाटप, आवश्यक सोयी सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबवणे यांनी सांगितले. यासाठी गरज भासल्यास शासन दरबारी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष आंबवणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन बेलापुर, नवी मुंबई येथील कार्यालयात अध्यक्ष निवडीचा सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी कार्यालयात सेक्रेटरी बाबासाहेब भोसले, खजिनदार लक्ष्‍मण साळुंखे, उपाध्यक्ष शंकर म्हात्रे, माजी अध्यक्ष तुकाराम दुधे, केके म्हात्रे आणि प्रकाश बाविस्कर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!