कळंबोली दि.२२(दीपक घोसाळकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाने ही घोषणा केली . क्षयरोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पंचायती राज संस्थांना सक्षम करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यासाठी पनवेल पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी शरद बडे आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत तालुक्यातील आठ गावातून क्षयरोग (टीबी) या रोगाचे उच्चाटन करण्यात आले.
राष्ट्रपतींनी क्षयरोग (टीबी) विरुद्ध देशाच्या लढ्याला गती देण्यासाठी व २०२५ पर्यंत क्षयरोग आजाराचे उच्चाटन करण्याचे पंतप्रधानांनी निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी टीबी-मुक्त भारत मोहीम सुरू केली. काही वर्षांपूर्वी क्षयरोग म्हणजे महाभयंकर बरा न होणारा आजार अशी लोकांच्या मनात भीती होती. पण आता हा आता हा रोगावर उपचार मिळेत आहेत. क्षयरोग मुक्त पंचायत’ उपक्रमाचा उद्देश या आजाराविषयी जागरुकता आणणे आणि स्थानिक सरकारी संस्थांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे आणि तेच काम पनवेल तालुक्यात केले जात आहे. पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक, गिरवले, पोसरी, जांभिवली, भातान, बारवई, केवाले, खैरवाडी या आठ गावातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्यात पनवेल पंचायती समिती आरोग्य विभागाला मोठे यश आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून क्षयरोग असलेल्या रुग्णावर उपचार केले. त्यांचे मनोधर्य वाढविण्याचे काम करून हा रोग बरा होते हे त्यांच्या मनावर बिंबवन्याचे काम केले. आज त्यांच्या प्रयत्नाने पनवेल तालुक्यातील आठ ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त होवून त्यांना केंद्रीय क्षयरोग विभाग कडून क्षयरोगमुक्त पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. आपला जीव धोक्यात घालून क्षयरोग मुक्त लढ्यात ज्यानी भाग घेतला त्या सर्वाचा सन्मान पनवेल पंचायत समितीकडून करण्यात आला.