पनवेल दि.७ : थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वासाठी वेचले. त्यांच्या अथांग कार्यामुळेच आपल्या परिसराला नावलौकिक प्राप्त झाला आहे, असे उद्गार भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज शेलघर येथे काढले. भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शकुंतला ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर आदींनी स्व. जनार्दन भगत यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
भगतसाहेबांनी शिक्षण आणि न्यायदानाचे महत्त्वपूर्ण कार्य करून सर्वसामान्य माणसाला आधार दिला. गावांमधील तंटे सोडवताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी नेहमीच सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, संजय भगत, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, माजी सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, वसंतशेठ पाटील, अरुणशेठ ठाकूर, जयवंत देशमुख, जितेंद्र म्हात्रे, विश्वनाथ कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत, अशोक कडू यांच्यासह स्वप्नील ठाकूर, कृपेश कांडपिळे, प्रकाश भगत, अजय भगत, इतर अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!