पनवेल दि.१०: भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलाचे मा. अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्ह्याचे सचिव ब्रिजेश पटेल यांचा वाढदिवस सेक्टर १९ येथील मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला.
खारघर शहरातील अनुभवी संघटक, कुशल नेतृत्व असे व्यक्तिमत्व अशी ब्रिजेश पटेल यांची ओळख आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ ची पनवेल महानगरपालिकेची पहिली ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत खारघर शहरातून शत प्रतिशत नगरसेवक निवडून आले होते. दांडगा लोकसंग्रह या गुणांमुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. खारघरमधील सर्वात लोकप्रिय असे सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे.
याप्रसंगी पनवेल विधानसभेचे प्रभाग ४ चे मा. सभापती, नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील या मान्यवारसाह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी शुभेच्छा दिल्या.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!