पनवेल,दि.7: कल्याण-डोंबिवलीच्या अतिरीक्तपदावरती कार्यरत असणारे श्री.मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न व रस्ते क्राँकीटीकरण, उद्यानांचे सुशोभिकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांनी भर दिला होता. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणूनही त्यांनी याठिकाणी काम पाहिले आहे. त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगरविकास विभाग, पुणे पालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.
महानगरपालिका क्षेत्रामधील नागरी सुविधा अंतर्गत 29 गावांमधील अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण, पनवेल महापालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम, ई सेवा सुविधा सुरू करण्यास प्राधान्य असणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!