ठाणे दि.२०: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना दा.कृ.सोमण म्हणाले की गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना – नवरात्रार॔भ असून शनिवार 12 ऑक्टोबर रोजी शारदीय
नवरात्र संपन्न होत आहे. सोमवार 7 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे.बुधवार 9 ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन आहे. गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री महालक्ष्मी पूजन आहे. त्याच दिवशी सरस्वती पूजन आहे.यावर्षी महाष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी करावयाचे आहेत. त्याच दिवशी सकाळी 11-42 ते दुपारी 12-30 संधीकाल पूजा आहे. विजया दशमी-दसरा सण शनिवार 12 ऑक्टोबर रोजी आहे. त्याचदिवशी सरस्वती विसर्जन आणि नवरात्रोत्थापन आहे.