माथेरान दि.२०: (मुकुंद रांजणे) माथेरान मधील काही महत्वाच्या पॉईंट भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटकांच्या सुविधेसाठी रेडिमेड सुलभ शौचालय उभारले होते परंतु अनेक वर्षांपासून या वॉश रूम (रेडिमेड सुलभ शौचालय ) मध्ये पाण्याची गैरसोय झाल्यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते यासाठी निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधित कामगार वर्गाला सूचना करून ज्या ज्या ठिकाणी या सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तसेच पाण्याची सोय नाही त्याठिकाणी सुस्थितीत पाणी आणि स्वच्छता बाबतीत कामे मार्गी लावल्या बद्दल संतोष शिंदे यांनी राहुल इंगळे यांसह कामगार वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!