पनवेल दि.२१: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे स्वीय सहाय्यक व कार्यकर्त्यांचे आवडते “ओम सर” ओम शेखर देशमुख हे आपल्या पुढील मास्टर या शिक्षणासाठी लंडन येथील हर्टफोर्डशायर विद्यापीठ मध्ये शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी रवाना होत आहे. त्यांच्या शुभेच्छा समारंभाचे आयोजन M.G Group च्या वतीने (सिद्धीविनायक बॅक्वेट) येथे शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी ओमकार देशमुख यांचे आई वडील व मित्र मंडळ तसेच M.G. Group चे सर्व सभासद उपस्थित होते.
अतिशय कमी वयात अतिशय व्यस्त असलेल्या १२-१२ तास काम करून सर्व कार्यकर्त्यांचे कॉल, साहेबांच्या सर्व देश विदेशातील बैठका, कामगार क्षेत्र, राजकारणातील वेळापत्रक सांभाळून अल्पवेळात ओम देशमुख यांनी आपल्या प्रेमळ मितभासी व अविश्रांत परिश्रमाचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनात,घरत परिवाराच्या हृदयात स्थान मिळवले आहे. अश्यातच त्यांनी आपल्या व्यग्र शेडयूलमध्ये सुद्धा आपले पदवीचे शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण करून व्यवस्थापन क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून पदवी संपादीत केली. महेंद्र घरत यांनी त्याला दिलेल्या आश्वासनानुसार पुढील शिक्षणा साठी लंडन येथे पाठवण्याचा निर्णय कार्यान्वित करून त्याला हर्टफोर्ट शायर विद्यापीठ लंडन येथे अॅडमिशन मिळवून देवून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.