पनवेलदि. २१: पितृपक्षात कोणतेही शुभ काम केले जात नाही. असे असताना रायगड जिल्ह्यात शेकडो घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांनी गणपतीची आज स्थापना केली आहे.
अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.
पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे.
या गौरा गणेशोत्सवाचे यंदाचे ३२वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत शांततामय साजरा केला जात असतो. महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस.के. नाईक, गौरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक, सचिव दिलीप अनभुले, इतर पदाधिकारी, सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सर्वांचे आकर्षण असलेल्या या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख, समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी प्रार्थना केली.

🛑बाप्पासाठी ओरायन मॉल मध्ये रंगली मोदक स्पर्धा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!