अध्यात्म म्हणजे काय? ते कोणत्या वयात करावं? दररोजच्या डेली रुटीनमध्ये अध्यात्म शक्य आहे का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रल्हाद पै यांनी ”प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल” या पॉडकास्टमध्ये दिली.

कर्जत दि.30: जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित ‘आनंद मेळावा’च्या सहाव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात तृप्ती पराडकर आणि अस्मिता दाभाडे या दोघींनी प्रल्हाद पै यांच्याशी संवाद साधला. ”प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल” या पॉडकास्टमध्ये त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. अध्यात्म म्हणजे काय? ते कोणत्या वयात करावं? दररोजच्या डेली रुटीनमध्ये अध्यात्म शक्य आहे का? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रल्हाद पै यांनी या पॉडकास्टमध्ये देण्यात आला.
अनेकदा अध्यात्म म्हणजे काय? याबाबत लोकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. यावेळी प्रल्हाद पै यांनी अध्यात्माची सोपी व्याख्या उलगडून सांगितली. प्रत्येकक्षण सावधपणे जगून आनंदाच वाटप करणं म्हणजे अध्यात्म. तसेच प्रत्येक क्षणाक्षणाला आनंदाच वाटप करत राहणे म्हणजे अध्यात्म.
सावध तो सुखी, हा सद्गुरु श्री वामनराव पै यांनी दिलेला अमृततुषार यावेळी विचारात घेण्यात आला.
अध्यात्माने लाईफस्टाईल चेंज होत नाही तर अध्यात्माने संपूर्ण जीवनच बदलून जातं. जीवनात सकारात्मक फरक पडतो. जीवनात बॅलेन्स लाईफ हवं असेल तर जीवनविद्येशिवाय पर्याय नाही, असं देखील यावेळी प्रल्हाद पै यांनी सांगितले.
तसेच या पॉडकास्टमध्ये अध्यात्माला सुरुवात कधीपासून करावी? अध्यात्मासाठी खास असं वय आहे का? असे प्रश्न विचारण्यात आला. यावेळी प्रल्हाद पै यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं. सुखी कधी व्हायचंय आज की उद्या तेव्हापासून अध्यात्माला सुरुवात करणे आवश्यक आहे.
अनेकदा असा समज असतो की, अध्यात्म हे म्हातारपणी, निवृत्त झाल्यावर करण्याची गोष्ट आहे. पण तसं अजिबात नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना वयात आल्यावर किंवा मुलांच्या जीवनात चांगल काही घडत नाही म्हणून नाही तर अगदी लहानपणापासून जीवनविद्येत आणणं गरजेचं आहे. कारण यावयातच त्यांच्यावर तसे संस्कार होतात आणि अध्यात्माचे ओढ त्यांना लागते.
खरे सद्गुरु कसे ओळखावे या प्रश्नाला उत्तर देताना प्रल्हाद पै यांनी सांगितले की, निरपेक्ष, कर्मकांड न करणे हे गुण सद्गुरुंमध्ये असणे आवश्यक आहे. 
आपल्याकडे फक्त विकास होत चालला आहे पण विवेकाकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. जीवनामध्ये उत्कर्ष आणि उन्नती होणे गरजेचे आहे.
हाव आणि धावमध्ये आपण गुंतत जातो. पण असं न करता सतत सद्गुरुंच स्मरण पाहिजे, समाधानाचं अधिस्टान, कोणतंही काम करताना सद्गुरुंनी म्हणजे चैतन्य शक्तीच स्मरण करत संसार करायच, असं प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
पुढे स्मरण कसं करायचं? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. कृतज्ञतेने स्मरण करायचं, असं प्रल्हाद पै यांनी सांगितलं. मीपणा अलिप्त होणे गरजेचं आहे.
कृतज्ञतेने भरलेले आणि भारलेलं मन आपल्यासाठी चांगल्या आणि योग्य असलेल्या वस्तू, वास्तू, परिस्थिती आणि व्यक्ती आपल्याकडे आकर्षित करत असतं.
वस्तू निर्जीव असली तरीही भाव त्यामधील सकारात्मक असतो. म्हणून कृतज्ञतेची भावना वस्तूबद्दलही व्यक्त करावी, असंही प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितलं.
आनंद मेळावाच्या सहाव्या दिवशीच्या पहिल्या पर्वात जेष्ठ प्रबोधक गणपत पाष्टे गुरुजी, जेष्ठ प्रबोधक अशोक नाईक आणि संध्या श्रीकांत नाईक – श्रीकांत पांडुरंग नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जीवनविद्या मिशनचे कार्य आयुष्यभर निस्वार्थपणे करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात जीवनगौरव या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी झाले होते. दररोज दोन पर्वात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांर्तगत करण्यात येत होते. सकाळच्या पहिल्या पर्वात ज्ञानेश्वर माऊली प्रणित हरिपाठ, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, गुरुपूजन, विश्वप्रार्थना साधना अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!