पनवेल दि.२४: पनवेलमध्ये राहणारे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नागरिकांच्या हक्काचा डॉक्टरमध्ये डॉ. एम. एन. इंन्डी प्रसिध्द होते. पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला भागात कसवा प्लाझा इमारतीत त्यांचे ३५ वर्षांपासून क्लिनिक होते. वर्षांनुवर्षे एकाच क्लिनिकमधून डॉक्टर इंन्डी यांना खऱ्या अर्थांने रूग्णसेवा केली. नव्या प्रशस्त जागेत क्लिनिक नेण्याचा विचार कधी केला नाही. गोरगरीबांची सेवा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. काही वर्षांपुर्वी त्यांची फी २ रूपये होती. त्यानंतर ही फी वाढून ५ रूपये इतकी झाली. ५ रूपये फी असली तरी तातडीने गुण येणारा डॉक्टरम्हणून पनवेलमधील उच्चभ्रु लोक देखील डॉक्टरांकडे जात असत. त्याचसोबत आर्थिक परिस्थितीत कमकुवत असलेले लोक तर डॉक्टरांकडून उपचारासाठी रांग लावत. पावसाळा सूरू झाला की पनवेलच्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची इंन्डींच्या क्लिनिकसमोर रांग लागत असे. शक्य असेल तर ५ रूपये द्या अन्यथा पैसे देवू नका या धोरणात पनवेलमध्ये सुमारे ४० वर्षे हा दवाखाना चालला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत रूग्ण तपासून घरी गेलेल्या डॉ. इंन्डी यांना रविवारी सकाळ हद्यविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तातडीने पनवेल शहरातील पँरामाऊंट रूग्णालयात दाखल केले परंतू त्यांना मृत घोषित करण्यात आले. क्लिनिकच्या दारात रूग्ण असल्यास रात्रीचे १२ एक वाजले तरी सर्व रूग्णांची तपासणी करूनच क्लिनिक बंद करणार ही इंन्डींची ओळख. सर्वसामान्यांच्या हक्काचा डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या इंन्डीचे निधन झाल्याचे कळाल्यानंतर अनेकांनी दुख व्यक्त केले आहे. कोळीवाडा परिसरातील त्यांच्या परिचितांनी फलक लावून श्रध्दांजली व्यक्त केली आहे. मोहम्मद युसुफ इन्डी असे नाव असले तरी डॉ. एम. एन इन्डी म्हणून त्यांची ओळख होती.
पैसे असतील तर ५ रूपये द्या आणि पैसे नसतील तर देवू नका असा व्यवहार ठेवून पनवेलमध्ये तब्बल ३५ वर्षे गोरगरिब रूग्णांची सेवा करणारे डॉ. एम. एन. इंडी यांचे रविवारी २१ जुलै रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

डॉ. इन्डी यांनी मागील ३५ वर्षे रूग्णसेवा केली. मी देखील अनेक वर्षे डॉ. इंन्डीकडे उपचार घेत होतो. गोरगरिबांचा हक्काचा डॉक्टर पनवेलकरांनी गमावला आहे. वैदयकीय क्षेत्राचे व्यवसायीकरण झाले असताना डॉ. इन्डी समाजसेवक म्हणून काम करीत होते. (लतीफ शेख: शहराध्यक्ष, कॉग्रेस)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!