ठाणे १६ : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या असणाऱ्या टीजेएसीबी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या संचालक मंडळाचा कालावधी २०२० ते २०२५ असा आहे. बँकेच्या अध्यक्षपदी सीए विवेक पत्की, तर उपाध्यक्षपदी शरद गांगल यांची निवड झाली आहे. सी. नंदगोपाल मेनन, सीए विवेक पत्की, रमेश कनानी, अॅड, प्रदीप ठाकूर, दिलीप सुळे, अनुराधा आपटे, मधुकर खुताडे या विद्यमान संचालकांसह डॉ. अश्विनी बापट, अॅड. समीर कांबळे, सीए वैभव सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली. नवनियुक्त अध्यक्ष विवेक पत्की यांची लेखा परीक्षक म्हणून प्रदीर्घ कारकीर्द असून ते आर्थिक आणि बैंकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत. उपाध्यक्षपदी निवड झालेले शरद गांगल हे मनुष्यबळ विकासतज्ज्ञ आहेत.