पनवेल दि.१७: रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘पनवेल फेस्टिवल’ यंदा २० ते २९ डिसेंबरदरम्यान खांदेश्वर येथील सर्कस मैदानात रंगणार आहे. आपल्या प्रगतीमध्ये आपल्या सुखी जीवनात समाजाचे सहकार्य नसेल, मदत नसेल तर आपण सुखी राह शकत नाही. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, त्या समाजाचे ऋण फेडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते,हे समाजाचे ऋण फेडण्याची संधी रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या पनवेल फेस्टिवलमधून प्रत्येकाला मिळत असते. पनवेल फेस्टिवल मध्ये नागरिकांनी खर्च केलेल्या पैश्यापैकी मोठा भाग समाजकार्यासाठीच वापरला जातो. असे प्रतिपादन प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार यांनी केले. पनवेल फेस्टिवल २०१९ च्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल गेली ५९ वर्षे पनवेल मध्ये सामाजिक सेवेत कार्यरत आहे, गेली २४ वर्षे पनवेल फेस्टिवल चे आयोजन करण्यात येत आहे, या पनवेल फेस्टिवल च्या आयोजनातून
मिळणारा सर्व आर्थिक फायदा सामाजिक उपक्रमांसाठीच वापरला जातो. आता पर्यंत रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या माध्यमातून रोटरी गार्डन, नवीन पनवेल येथे उभारण्यात आलेली वायू प्रज्वलित शवदाहिनी है मोठे प्रकल्प आहेत, तसेच पनवेल-पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना बेचेस, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये बांधण्यात आली आहेत, तसेच पुढील वर्षी सुशिक्षील आणि अशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि त्या संबंधित आवश्यक त्या सुविधा पुरविणारी संस्था सुरु करण्यात येणार आहे. अशी संस्था हि काळाची गरज असल्याचे हि किरण परमार यांनी सांगितले.पनवेल फेस्टिवल मध्ये खरेदी साठी विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉन व्हेज स्टॉल्स,मुलांसाठी खेळण्याची साधने, आणि दररोज स्थानिक कलाकारांचे तसेच नामवंत कलाकारांचे मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २० डिसेंबर ते २९ डिसेंबर पर्यंत रोज संध्या. ४.०० ते रात्री १०.०० वाजे पर्यत आयोजित या पनवेल फेस्टिवल ला पनवेल – कामोठे- कळंबोली – खारघर परिसरातील नागरिकांनी एकदा तरी आवर्जून भेट दयावी असे आवाहन हि किरण परमार यांनीया वेळी केले. या पत्रकार परिषदेस रोटेरियन सतीश पावशे, राजाभाऊ गुप्ते, रमेश भोळे, संतोष आंबवणे तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!