मुंबई, दि. ९: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान वार्षिक हप्त्यात देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचा लाभ राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील माध्यमिक विभागामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्धवेळ शिक्षक / शिक्षकेतर अशा एकूण ३,२९,५४८ कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असणारे आणि अंशत : अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अर्धवेळ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!