राजे प्रतिष्ठान पनवेल यांचा कौतुकास्पद उपक्रम; प्रथमच सिनेमागृहात जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद !
पनवेल दि.३०: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राजे प्रतिष्ठान कार्यरत आहेत. आज दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी राजे प्रतिष्ठान रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पनवेल तालुक्यातील गोर – गरीब मुले व आदिवासी पाड्यांवरील मुलांना “तानाजी – द अनसंग वॉरियर” चित्रपट मोफत दाखविण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यावेळेस महाराजांप्रती असलेली प्रत्येक मावळ्याची निष्ठा व स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांची माहिती या चित्रपटातून लहान मुलांना मिळाली. राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा सांघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार म्हणजेच ज्या मुलांनी वा लोकांनी कधीही सिनेमागृह पाहिलेला नाही अशा लोकांना प्रथमच सिनेमागृहात तानाजी सिनेमा दाखविण्यात आला. १०० ते १५० हुन अधिक लहान मुले व नागरिक यांनी सिनेमा पहिला व राजे प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतूक केले. यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, खारघर शहर महिला अध्यक्षा ऍड. संतोषी चव्हाण, विनोद पिंगळे, कल्पेश चव्हाण, कल्पेश देशमुख, संदीप गर्जे, निनाद सेल, शीतल शिंदे, धनिषा सोरखदे, सविता सोरखदे आदी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133