अलिबाग दि.७: रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलईमध्ये खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयास्पद बोट आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.
कोरलाई समुद्रात संशयास्पद बोट दिसल्यानंतर स्थानिक जनतेला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही संशयास्पद बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईवर २६/११ चा हल्ला केलेले पाकिस्तानी दहशतवादी हे समुद्रमार्गे बोटीमधून आले होते. त्या पार्श्वभूमीवर संशयित बोटीबाबत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक-नाशक पथक अशा सर्व यंत्रणा तेथे पोहोचल्या आहेत.

🛑पुढच्यावर्षी आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीराने !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!