रत्नागिरी दि.१९ ( सुनिल नलावडे)रत्नागिरी ग्रीन रिफायनरीला राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात आला असून याबाबतच्या समर्थनाचे निवेदन राजापूरचे निवासी नायब तहसीलदार अशोक शेळके यांना मंगळवारी देण्यात आले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर, खजिनदार व राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक दिनानाथ कोळवणकर, अर्बन बँक संचालक रज्जाक डोसानी, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर, बाळा पोकळे, कमाल मापारी व इतर सदस्य उपस्थित होते.