पनवेल दि.१०: वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. वैभव खुटले कामोठे येथील एमजीएम मिशन मेडिकल महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणार आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यानुसार मदत करण्यात आली तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, मंडळाचे व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!