पनवेल दि.११: समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.
मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील ४७ वर्ष पासून वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. हे कार्य करीत असताना महाराष्ट्रातील विविध शहरात दरवर्षी अधिवेशन भरवले जाते परिषदेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन ही केले जाते. याच परिषदेला प्रोत्साहन मिळावे याकरिता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला वीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. आज माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २० लाखाचा धनादेश मराठी अर्थशास्त्र परिषदेला सुपूर्द केला.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. अनिल कुमार वावरे, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. अविनाश निकम, खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, परिषदेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. संजय धोंडे, प्राध्यापक काकासाहेब ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री भागुबाई चांगु ठाकूर यांच्या नावाने परिषदेकडून पारितोषिके आणि व्याख्यानमाला चालवण्याच्या सद्हेतूने भरीव निधी परिषदेला देण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे यांनी दिली आहे तसेच त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत.