मुंबई दि.15: राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पनवेल पालिकेचे माजी उपमाहापौर विक्रांत पाटील यांनाही संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य महासचिव पदाची जवाबदारी पार पाडत असतानाच पक्षाने विक्रांत पाटील यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. यामुळे पनवेलमधील भाजपा कार्यकर्त्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

🛑Narendra Modi Marathi Speech
🔸’आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे’
🔹पंतप्रधानांचा महाराष्ट्राच्या जनतेशी मराठीतून संवाद

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!