रत्नागिरी दि.१६ (सुनिल नलावडे) तळकोकणात गेले दोन दिवस तुफान पाऊस कोसळत असून रत्नागिरी जिल्हा जलमय झाला आहे. गेल्या रात्री समुद्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व लाटांचे तांडव सुरू असतानाही मच्छीमारी शुभारंभ करण्याआधी समुद्राला नारळ देऊन मासेमारी करायला गेलेली बोट बुडाली बोटीवरील सहा खलाश्यांपैकी चार जण बचावले तर दोन जण बेपत्ता होते त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध चालू आहे. ही घटना दापोली तालुक्यात केळशी समुद्रात घडली. बोट मालक मकबुलशेख अली चाऊस यांची असून माशाल्ला नावाची यांत्रीक बोट असून लोटांच्या तडाख्याने पलटी झाली होती. समुद्रातील अन्य बोटीनी त्याचार जणांना वाचवले . शाहदत बोरकर याचा मृतदेह मिळाला आहे तर गणीखमसे याचा शोध चालू आहे.
पावसाचे थैमान सूरूच असून चिपळून संगमेश्वर माखजन मध्ये पूरस्थिती असून तेथील बाजारपेठा पाण्याखाली गेल्या असून तिन पुठावर पाणि भरले आहे. महामार्गावरील वाशिष्ठिपुल वाहतुकीस बंद करण्यात आला कोयना धरणातुन झालेला पाण्याचा विसर्ग व काल रात्रीपासुन दिवसभर कोसळणारा पाऊस यामुळे वाशिष्टी नदीचे पाणी शहरात घुसले, शहरातील सर्वच भागात पाणी शिरल्याने व्यापारांचे व शहरवासीयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
संगमेश्वरच्या गड नदीला पुर आल्याने माखजन बाजारपेठेत पाणि भरले आहे. रात्रीपासूनच पाण्याचा जोर वाढत असल्याने व्यापारी व नदी काठच्या रहीवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.