पनवेल दि.१६: येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरूनाथ लोंढे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रूचिता या अर्किटेक्ट असून, स्वप्नील कल्याणकर अर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहेत. दिवंगत मुग्धा लोंढे यांच्या शोकसभेवेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुचिता लोंढे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची ग्वाही दिली होती. रुचिता लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संदीप लोंढे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीला मतदान होणार असून, १० जानेवारीला मतमोजणी आहे.