पनवेल दि.9: पनवेल शहराचा पॉझीटिव्हीटी दर कमी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रांमध्ये बाहेर गावावरुन प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांची व संशयित व्यक्तींची आरटी पीसीआर आणि रॅट चाचणी करणे बंधन कारक आहे असे निर्देश पालिका आयुक्त यांनी दिलेले आहत. या अनुषंगाने बाहेर गावावरून येणाऱ्या तसेच रोज ये-जा करणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व संशयित व्यक्तींची पनवेल रेल्वेस्थानक तसेच पनवेल एस.टी महामंडळाच्या आगारांमध्ये प्रवाश्यांची आरटी पीसीआर आणि रॅट चाचणी करण्यात येत आहे.
याचबरोबर रहिवासी सोसोयट्यांमधील हाय रिस्क आणि लो रिस्क व्यक्तीं, महानगरपालिका क्षेत्रांबाहेरून प्रवास करून आलेल्या प्रवासी गर्दीची ठिकाणे जसे की कळंबोली- मॅकडोनल्ड, तसेच दुकाने, भाजी मंडई, सार्वजनिक ठिकाणी गर्दी असणाऱ्या शासकीय,निमशासकीय, खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांच्या देखील आरटी पीसीआर आणि रॅट चाचण्या करण्यात येत आहेत.
सोमवार दि.7 जून पासून पनवेल कार्यक्षेत्रात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यानूसार अत्यावश्यक सेवे शिवायची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर पनवेल शहरात तसेच इतर नोडमध्ये देखील सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरेानाचीरूग्णसंख्या कमी झाली असली तरी ती संपली नाही. कोरोनाचा आलेख उतरता ठेवायचा असेल तर वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे ही त्रिसूत्री नागरिकांना पाळणे आवश्यक आहे.