पनवेल दि.9: जागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘शास्त्रशुद्ध-लयबद्ध सूर्यनमस्कार स्पर्धा २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे.
आठ गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास ५५५५ रुपये, द्वितीय क्रमांकास ३३३३ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २२२२ रुपये तसेच दोन उतेजनार्थ प्रत्येकी ११११ रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह अशी एकूण विजेत्यांना ९८ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. हि स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी मर्यादित असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने सूर्यनमस्काराचा व्हिडीओ रेकॉर्ड करून १५ जून पर्यंत pareshthakur.in या संकेत स्थळावर पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे २१ जूनला म्हणजेच जागतिक योग दिनी जाहीर करण्यात येणार आहे.या स्पर्धेचा जास्तीत जास्त योग प्रेमींनी लाभ घ्यावा, त्यासाठी  अधिक माहितीसाठी ७७५७०००००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!