अलिबाग,दि.10 :- ग्रामविकास विभाग, मंत्रालय,मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंच व उपसरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती-जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.
रायगड जिल्हयात ग्रामपंचायतींच्या एकूण 809 पदातील अनुसूचित जातीसाठी 33 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातील खुल्या प्रवर्गासाठी 16 तर 17 पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 124 पैकी खुल्या प्रवर्गासाठी 62 व महिलांसाठी 62 पदे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण 218 पदांपैकी 109 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे आरक्षित असणार आहेत,
सर्वसाधारण जागांसाठी एकूण 434 पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 217 तर महिलांसाठी 217 पदे राखीव असणार आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :-
अलिबाग- ग्रामपंचायत संख्या-62,अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा-खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे-खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16.
मुरुड- ग्रामपंचायत संख्या- 24, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 3, महिला 3, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 6.
पेण- ग्रामपंचायत संख्या- 64, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 7, महिला 7, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा- खुला 16, महिला 16.
पनवेल- ग्रामपंचायत संख्या- 71, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-2, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 10, महिला 9, सर्वसाधारण जागा- खुला 19, महिला 19.
उरण- ग्रामपंचायत संख्या- 35, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 1, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 11, महिला 11.
कर्जत- ग्रामपंचायत संख्या- 54, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 8, महिला 8, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 7, महिला 8, सर्वसाधारण जागा- खुला 10, महिला 11.
खालापूर- ग्रामपंचायत संख्या- 44, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 5, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 10, महिला 10.
रोहा- ग्रामपंचायत संख्या- 64, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-2, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 5, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा- खुला 17, महिला 17.
सुधागड- ग्रामपंचायत संख्या- 34, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-0, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 6, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 7.
माणगाव- ग्रामपंचायत संख्या- 74, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-2, महिला-2, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 4, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा- खुला 21, महिला 22.
तळा- ग्रामपंचायत संख्या- 25, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा- खुला 6, महिला 6.
महाड- ग्रामपंचायत संख्या- 134, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-3, महिला-3, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 4, महिला 5, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा- खुला 42, महिला 41.
पोलादपूर- ग्रामपंचायत संख्या- 42, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-2 अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 1, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 5, सर्वसाधारण जागा- खुला 13, महिला 12.
श्रीवर्धन- ग्रामपंचायत संख्या- 43, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-0, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 3, महिला 3, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 12, महिला 12.
म्हसळा- ग्रामपंचायत संख्या- 39, अनु:जाती आरक्षित जागा- खुला-1, महिला-1, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला 2, महिला 2, नामाप्र आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 5, महिला 6, सर्वसाधारण जागा- खुला 11, महिला 11.
जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती आरक्षित जागा- खुला-16, महिला-17 अनुसूचित जमाती आरक्षित जागा- खुला 62, महिला 62, नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागा 27 टक्के प्रमाणे- खुला 109, महिला 109, सर्वसाधारण जागा- खुला 217, महिला 217.