अलिबाग, दि.22 : जिल्हयात गुरुवार, दि. 21 मे 2020 रोजी पासून रेड झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून 50 टक्के आसन क्षमतेसह व इतर शर्तींवर जिल्हयांतर्गत रायगड परिवहन सेवा सुरु करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार या जिल्हयामधील प्रमुख मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये शुक्रवार, दि. 22 मे 2020 रोजी पासून रायगड परिवहन वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
या एस.टी. बसेसचे वाहतुकीचे मार्ग महाड ते माणगाव, महाड ते गोरेगाव, महाड ते पोलादपूर, अलिबाग ते पेण, अलिबाग-रामराज मार्गे रोहा, अलिबाग ते रेवदंडा, पेण ते खोपोली, पेण ते पाली, श्रीवर्धन ते म्हसळा, श्रीवर्धन ते बागमांडला, श्रीवर्धन ते बोर्ली, कर्जत ते अलिबाग, कर्जत ते पाली, रोहा ते नागोठणे, रोहा ते तळा, मुरुड ते अलिबाग, मुरुड ते रोहा, माणगाव ते महाड, माणगाव ते म्हसळा, माणगाव ते पेण असे असतील.
तसेच प्रत्येक प्रवाशाने व रा.प. कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करण्यापूर्वी सॅनिटायजरने आपले हात निर्जंतूक करावेत, रा.प.बसमधून प्रवास करण्यासाठी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त प्रवासास अनुमती दिली जाणार नाही, प्रवासामध्ये प्रवाशांनी व रा.प. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे विभाग नियंत्रक,रा.प. रायगड विभाग, पेण अनघा बारटक्के यांनी कळविले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!