नवी मुंबई, दि.22: कोकण विभागातील विविध जिल्हयांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजूरांपैकी आतापर्यंत एकूण 3 लाख 15 हजार 601 मजूरांना 220 विशेष रेल्वेगाडयांनी त्यांच्या मुळराज्यात पोहचविण्यात आले आहे. अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकी सर्वात जास्त प्रभावी अशी उपाययोजना म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादूर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कारागीर, विद्यार्थी, पर्यटक हे ज्या ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी अडकले होते. या पराराज्यातील अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या मुळ राज्यात पाठविण्यासाठी आता शासनाने मुभा दिली आणि विशेष गाडीने त्यांना रवाना करण्यात आले.
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्हयांध्ये अडकलेल्या युपी, बिहार, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, हरीया़णा व पंजाब या राज्यांमधील नागरीकांना त्यांच्या राज्यात अथवा मुळ निवासस्थानापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडया सोडण्यात आल्या. आतापर्यंत सोडलेल्या गाडया व नागरिकांची संख्या अशी ठाणे 20 गाडया 25 हजार 991 प्रवासी, पालघर 20 गाडया 32 हजार 432 प्रवासी, रायगड 17 गाडया 25 हजार 053 प्रवासी, रत्नागिरी 4 गाडया 5 हजार 072 प्रवासी, सिंधुदूर्ग 2 गाडया 3 हजार 912 प्रवासींना त्यांच्या मुळ राज्यात मुळ निवासस्थानी पोहचविण्यात यश आले आहे. अजूनही विविध गाडया सोडण्याचे शासनाचे नियोजन आहे.
पराराज्यातील नागरिकांना ज्या राज्यात जायचे आहे, त्या राज्यासाठी असलेल्या विशिष्ट फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरुन त्यांची माहिती संकलीत करण्यात आली व त्या माहितीच्या आधारे प्रवाश्यांच्या संख्येनुसार विविध राज्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या गाडया सोडण्या आधी प्रत्येक प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय दृष्टया ज्यांचे आरोग्य सुदृढ आहे आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा प्रवाशांनाच या रेल्वे गाडयांमध्ये प्रवेश देण्यात आला. गाडीत प्रवेश देण्याआधी सर्व प्रवाशांना शासनाने ठरवून दिलेले सोशल डिस्टंन्सिंगचे नियम व कोरोना विषयीच्या सुचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!