पनवेल, दि.१३ पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गांनी त्रिपुरा पौर्णिमा उत्सव साजरा केला.
यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दिप लावले व संपूर्ण मंदिर परिसर दिपाच्या तेजाने उजळून निघाला. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेवून त्रिपुरा पौर्णिमा उत्सव साजरा केला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!