पनवेल, दि.१३ पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 11 लाख रुपये किंमतीचे एकूण 63 मोबाईल हस्तगत केले असून याप्रकरणी दोन आरोपीस झारखंड येथून अटक केली आहे.
मागील काही महिन्यांपासून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारांमध्ये मोबाईल चोरीचे गुन्हे घडत होते. पोलीस उप आयुक्त अशोक दुधे परिमंडळ 2 नवी मुंबई यांनी लवकरात लवकर मोबाईल चोरी करणार्‍या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले, त्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 448/2019 खझउ 379 हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे कुंदन कुमार अर्जून महतो वय 21 वर्ष, राहणार झारखंड यास अटक करण्यात आली आहे. नमूद गुन्हा दाखल झाल्यापासून 22 तासाच्या आत गुन्ह्याचे तपासादरम्यान पनवेल व गुजरात मधून एकूण 63 मोबाईल फोन – आय फोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, एमआय, लेनोवो, मोटरोला, इत्यादी कंपनीचे एकूण 11 लाख 10 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. नमूद अटक आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याचा एक साथीदार नामे आझम जेक्कु शेख, राहणार झारखंड यास झारखंड येथुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरी केलेले मोबाईल हे आरोपी नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.अटक आरोपींचे इतर साथीदारांचा शोध चालू आहे.
नमूद कारवाई पोलीस उपायुक्त अशोक दुधे, परिमंडळ 2 नवी मुंबई, यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे पनवेल शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विजय तायडे, पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ईशान खरोटे, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस नाईक दिनेश जोशी, पंकज पवार, पोलीस शिपाई राहुल साळुंके,अजय कदम, राजू खेडकर यांच्या पथकाने केली आहे तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि ईशान खरोटे, नेमणूक पनवेल शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
फोटो ः पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केलेले मोबाईल

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!