पनवेल दि.०१: 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूह व पदवीधर प्रकोष्ठ भाजपा, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचे राजकीय योगदान व सहभाग’ या विषयावर महाचर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर महाचर्चा सत्रात प्रमुख अतिथी म्हणून आमदार तथा सरचिटणीस भाजप महाराष्ट्र
श्रीकांत भारतीय, आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा उत्तर रायगड प्रशांत ठाकूर, प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ तथा चेअरमन आदर्श शैक्षणिक समूहाचे धनराजजी विसपुते, संचालिका संगीता विसपुते सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ शिवाजी महाराज यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले. ‘युवकांचे राजकीय योगदान व सहभाग’ या विषयांतर्गत महाराष्ट्राच्या राजकारणात शहरी व ग्रामीण तरुणांचा सहभाग, बेरोजगारी, महिला विकास,महाराष्ट्राचा व पनवेलचा विकास, डबेवाल्यांचे प्रश्न तसेच महाचर्चा आयोजनाचा उद्देश्य,G 20 व Y 20, Joy of Giving, इत्यादी विषयांवर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थित श्रीकांत भारतीय व प्रशांत ठाकूर यांचे सोबत महाचर्चा करण्यात आली.
श्रीकांत भारतीय यांनी पदवीधरांचे प्रश्नाचे निरासन करून पदवीधरांना सखोल असे मार्गदर्शन केले. कौशल्य विकास योजना बद्दल जाणीव करून दिली. तर प्रशांत ठाकूर यांनी शहरी आणि ग्रामीण राजकारणाचे अनेक पैलू आपल्या उत्तरांतून उलगडले. या महाचर्चा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत अतिथींसोबत बी.एड.व एम. एड च्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांचे आभार मानून महाराष्ट्र गीताने झाली.
![](https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2023/05/Collage-Maker-01-May-2023-06-14-PM-4549.jpg)