पनवेल,दि.1 : महाराष्ट्र दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आज आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली. तसेच महापालिका शिक्षकांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायले.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे,उपायुक्त कैलास गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक व माजी नगरसेविका, सर्व विभाग प्रमुख, महापालिका अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
🔴महाराष्ट्र दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकाचे उत्तराधिकारी बबन जगनाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, माजी नगरसेविका दर्शना भोईर,महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सदस्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
🔴पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका शिक्षक, शांळेचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नागरिक, उपस्थित होते.
🔴आयुक्त बंगल्यातही आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले.