नवी दिल्ली दि.5: केंद्र सरकारने 15 ऑक्टोंबर पासून देशातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. आधी मोठ्या वर्गांच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरू करण्यात येतील. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार आहे तसेच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असेल. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोजच हजर रहावे लागेल असे नाही. त्यात मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!