पनवेल दि.०३: पनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लोंढे व ओझे परिवारातर्फे आणि कच्छ युवक संघ व युवा नाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी १०८ रक्तदात्यांची रक्तदान केले. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
पनवेल शहरातील श्री विरूपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिरास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, विद्या गायकवाड, रूचिता लोंढे, भाजप नेते नंदू पटवर्धन, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक राजू गुप्ते, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माधुरी गोसावी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, शहर अध्यक्ष राहुल जगताप, अभिषेक भोपी, चिन्मय समेळ, जितेंद्र वाघमारे, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
