पनवेल दि.६: नवीन पनवेल ते नेरे या मार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे येथे मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे तसेच भविष्यात नैना प्रकल्पामुळे विकास होणार असून, नागरीकरण वाढणार आहे. ते लक्षात घेत भाजपच्या वतीने सुकापूर येथे एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता जगताप आणि महापालिकेचे अभियंता कटेकर यांच्यासोबत सुकापूर येथे जाऊन पाहणी करून चर्चा केली.
नवीन पनवेल ते नेरे या परिसराचा नैना प्रकल्पातंर्गत विकास होत आहे. त्यामुळे येत्या काळात येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होणार असून, या ठिकाणांवरील रस्त्यांवर ताण पडणार आहे. तसेच एचडीएफसी सर्कल ते आदई सर्कल आणि कळंबोली सर्कल या ठिकाणी होणारी वाहनांची कोंडी लक्षात घेता भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी आणि या परिसरात ये-जा करणार्‍या वाहचालकांच्या वेळ व इंधनाची बचत व्हावी याकरिता भाजपच्या वतीने सुकापूर येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या माध्यामातून वाहतुकीसाठी एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता जगताप व महापालिकेचे अभियंता कटेकर यांच्यासोबत त्या ठिकाणाची पाहणी करून चर्चा केली. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव तसेच राजेश पाटील उपस्थित होते. या वेळी परेश ठाकूर यांनी लवकरात लवकर यातून मार्ग निघावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!