मुंबई दि.५: सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणू संकटाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यावर सरकार सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेच, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी आज, 5 एप्रिल रोजी सर्वांनी आपल्या घरातील लाईट्स बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पीएम मोदी यांनी केले होते. त्यानुसार रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी संपूर्ण देशात दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळाला. देशातील विविध भागात लोकांनी दिवे लावून पीएम मोदींच्या या आवाहानाला साथ दिली.