पनवेल दि. 6: प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः, अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन पनवेल भाजपच्यावतीने कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी भारतमाता, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच जयंत पगडे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे रोहन करण्यात आले.