पनवेल दि.६: पनवेल महानगरपालिकेत आता पर्यंत एकूण १६ पॉझिटिव केसेस आहेत. या १६ पैकी ११ केसेस CISF च्या जवानांच्या आहेत. तर पाच पाॅझिटिव्ह केसेस अन्य नागरिकांच्या आहेत. यापैकी ११ जवानांमधील एक जवान पूर्णपणे रिकव्हर होऊन आलेले आहेत.
अन्य पाच नागरिकांपैकी दोन नागरिकांची पूर्णपणे रिकव्हरी झालेली आहे. या व्यतिरिक्त मनपा हद्दीबाहेर पनवेल तालुक्यामध्ये महापालिकेला संलग्न भागात असलेल्यांमध्ये एकूण ४ पॉझिटीव्ह केसेस या उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यात एक मूळ रुग्ण होता आणि त्याच्या संपर्कात आलेले तीन व्यक्ती आहेत. सद्यस्थितीमध्ये पनवेल मनपा शहर हद्दीतील १६ आणि ग्रामीण मधील ४ अशा २० रुग्णांची नोंद झालेली आहे.
