पनवेल, दि.23: पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची बदली ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी पनवेलकर पवन चांडक यांची नियुक्ती पनवेलचे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
राहुल मुंडके यांच्यावर विधानसभेच्या अधिवेशन काळात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले होते. त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. तर पवन चांडक यांनी पूर्वी पनवेल तहसिलदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे या परिसराचा अभ्यास त्यांना आहे. तहसीलदार म्हणून पनवेलमध्ये आलेले चांडक पनवेलकरच झाले.

पवन चांडकांचे सायकलप्रेम:
स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी सायकल चालविणे चांगले असल्यामुळे काही वर्षांपूर्वी जडलेले सायकलप्रेम पावन चांडक यांना परदेशापर्यंत घेऊन गेले.
या सायकलप्रेमामुळे त्यांनी महाराष्ट्रात अनेक सायकल स्पर्धा पूर्ण केल्या. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सायकल चालवत त्यांनी भूतान ते चीन सीमा असा १४०० किलोमिटरचा प्रवासदेखील पूर्ण केला आहे. अनेक सायकल मोहिमेत सहभागी होणाऱ्या चांडक यांनी जगातील सर्वांत जुनी १८९१ साली सुरू झालेल्या पॅरिस ब्रेस्ट पॅरिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांनी एकदा होणाऱ्या स्पर्धेत १२०० किमीचे अंतर ९० तासांत पूर्ण करण्याचे लक्ष असते. एकूण ६३ देशांमध्ये या स्पर्धेची पात्रता फेरीत होते. शेकडो किमीचा प्रवास करून अंतिम फेरीसाठी निवड झाल्यानंतर चांडक यांनी १४०० किमी अंतर ९५ तासांत पूर्ण केले. १४०० किलोमिटरच्या अंतरात त्यांनी फक्त सात तासांची विश्रांती घेतली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!